मातीचा ध्यास' ही हरीश गोरे लिखित एक अत्यंत प्रेरणादायी आणि वास्तववादी कादंबरी आहे. ही कथा आहे सह्याद्रीच्या कुशीतील सार्थक शिंदे या सामान्य ग्रामीण मुलाची.
शिक्षणाच्या संकुचित चौकटीत गणितामुळे ज्याला 'ढ' ठरवले गेले, त्याच्या पायात वाऱ्याची अफाट ताकद होती. दारिद्र्य, दुष्काळ आणि बापाचे विखारी टोमणे यांमुळे त्याच्या वाटेत अपमानाचे अनेक कांटे होते. परंतु, अण्णा नावाच्या निस्वार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनवाणी पायांनी डोंगराच्या कपारींवर आणि वाळूत खडतर साधना केली.अनेकदा अपयशाचे चटके खात, सोलवटलेल्या कातड्याची पर्वा न करता त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत. अखेर, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय क्रीडा आखाड्यात २०० मीटर शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करत त्याने सुवर्णपदक पटकावले व मातीचा सन्मान वाढवला.
"प्रगतीपुस्तकावरचे लाल शेरे माणसाचे भवितव्य ठरवू शकत नाहीत, तर घामाचा प्रत्येक थेंब नवा इतिहास घडवू शकतो," हा अमूल्य संदेश ही कादंबरी देते.
Amazon Limk

No comments:
Post a Comment
Thank you