सोमवार दिनांक ६ जुलै
२०२० पासून दर सोमवारी मी घेऊन येतोय वरील शीर्षकाखाली काही नवीन......काही
जुनं...... काही मनातील......काही मनाच्या पलीकडील.....काही शब्दातील..... काही
शब्दाबाहेरील......काही ओंजळीतील....... काही ओंजळीतुन सांडलेल..... मी तर याचा
अनुभव घेतला आहे, तुम्हीपण घ्या.
अगदीच निवांत असाल तेंव्हा वाचा. मी शब्द देतो, तुम्हाला खोल चिंतनात बुडविल्याशिवाय सोडणार नाही.
मी पुस्तक लिहलं आणि माझ्या अनेक वाचकांना व हितचिंतकांना
माझे विचार केवळ भाषेमुळे समजले नाहीत. अनेकांनी मराठीतून लिहा असा आग्रह केला.
अनेकांनी त्यावेळी केवळ भाषेमुळे माझ्यावर टिकाही केली. मित्रहो, मी जाणतो, हे माझ्यावरील आपले प्रेमच आहे. खरं तर भावनांच्या आड भाषा
कधीच येत नाही. परंतु भाषेच्या आकलनाशिवाय भावनाही कळत नाहीत. त्यामुळे मनात सतत
मराठीवर आपण अन्याय केल्याची अपराधी भावना झाली. कदाचित काय माहीत मी न जाणो आणि
पुन्हा इंग्रजी लेखनाकडे वळो....? त्याआधी माझी ही मराठीशी नाळ घट्ट आहे हे दाखवण्याची धडपड.....
सदरचे लिखाण सण २००६ व काही लेख २०१४ साली लिहलेले आहे. या लॉकडाऊनच्या काळात हळूहळू डिजिटल केलेत. थोडा त्रास झाला. पण या त्रासाची मागे मला सवय झाली आहे. शिवाय आपल्या सर्वांना काही देण्याचं समाधान सतत मनात होतं. काही चुकीचं वाटलं तर माफ करा. आवडलं तर सांगा. तेंव्हा भेटू लवकरच...... मराठी बाण्यासह
सर्व लेख copy right act © खाली नोंद आहेत. नावासह copy करताना परवानगीची गरज नाही. लेख माझ्या facebook खात्यावर, facebook page वर आणि माझ्या blog वर आहेत. Just enjoy.....